मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच स्तरांतील नागरिकांवर परिणाम झाला. आता कोरोनाच्या महामारीत महागाईचा मार बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, आयात करावर दोन्ही देशांनी लावलेले आयात-निर्यात शुल्क, परदेशांत कमी झालेले उत्पन्न, कामगारांचे प्रश्न, कोरोनाचे संकट यांमुळे सर्वाधिक आयात या विविध कारणांमुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. किरकोळ बाजारात या किमतीत २० टक्क्याने आणखी वाढ होत आहे. त्यामुळे तेल २०० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये दरवाढ झाली असून ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही वाढ कायम राहणार असल्याचे तेलविक्रेत्यांनी सांगितले.
-- गृहिणींच्या प्रतिक्रिया --
-- कोट --
प्रत्येक अन्नपदार्थाच्या फोडणीसाठी खाद्यतेल हा स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक आहे. खाद्यतेलांच्या किमतीतही दिवाळीनंतर कमालीची वाढ झाल्याने घरचा खर्च चालविणे कठीण झाले आहे. महागाईमुळे कमाई कमी, खर्च अधिक सुरू आहे.
लक्ष्मी पाटील, गृहिणी
-- कोट --
स्वयंपाकासाठी तेलाची गरज असते. त्यामुळे तेलाची खरेदी ही करावीच लागते. तेलाच्या किमती वाढल्याने बजेट कोलमडले आहे. त्यामुळे दररोजच्या तेलवापरात कपात केली आहे.
अंकिता दीक्षित, गृहिणी
-- कोट --
सण-उत्सवाच्या काळात तेलाचा अधिक वापर केला जातो. या वर्षी खाद्यतेलाचे भाव जास्त वाढल्याने होळीला तेलवर्गीय खाद्यपदार्थांचा वापर कमी करावा लागला. भाजीसाठीसुद्धा कमी तेलाचा वापर करावा लागत आहे.
कविता गवई, गृहिणी
--कोट--
कोरोनाचे वाढत चाललेले संकट, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती, तेल वाहतूक व्यवस्थेत येत असलेला अडथळा आणि तेलाचा कृत्रिम साठा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तेलाच्या दरांत वाढ झाली आहे.
- भरत अग्रवाल, तेल व्यापारी
--बॉक्स--
मार्चमध्ये उच्चांकी वाढ
खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक वाढ झाली आहे.
--बॉक्स--
विदेशी बाजारात वाढल्या किमती
मागील वर्षभरापासून नागरिकांना कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींत वाढ झाली. तेलाचा कृत्रिम साठा वाढला, या कारणामुळे तेलाच्या दरात वाढ झाली आहे.
-- बॉक्स --
खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)
तेल मार्च २०२० मार्च २०२१
करडी १९५ २१०
सूर्यफूल १३० १६५
शेंगदाणा १५० १८०
सोयाबीन ९४ १४९
सरकी तेल ९० १३८