अकाेला : अकाेला जिल्ह्यात सध्या महिलाराज खऱ्या अर्थाने अस्तित्वात येत असून, त्यामध्ये आता माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचीही भर पडली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर सुचिता पाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाटेकर या परभणी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत हाेत्या. त्यांनी विनंतीवरून अकाेला येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी या रिक्त पदावर बदली मागितली हाेती. शासनाने त्यांची विनंती मान्य करून शुक्रवारी त्यांना या पदावर नियुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर याआधीच डाॅ. वैशाली ठग कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाची धुरा आता महिलांच्या हाती आली आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी, जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी सक्षमपणे काम करीत आहेत.