वाडेगाव: क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांनी समस्त महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षणामुळेच महिला सक्षम झाल्या आहेत, असे प्रतिपादन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी घुगे यांनी केले. रविवारी रोजी आयाेजित सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात त्या बाेलत हाेत्या.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे व उपकेंद्राचे सर्व महिला कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे हरार्पण करून पूजन करण्यात आले. नंतर डॉ. शुभांगी घुगे यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी आरोग्यसेविका सुनीता राठोड, अनिता इंगळे, शारदा कागणे, शांता चव्हाण, जयश्री चव्हाण यांची उपस्थिती हाेती.