लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते. मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा व्याख्याते प्रा. रमेश पानसे (पुणे) यांनी मांडले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्यावतीने आयोजित नवरात्र व्याख्यानमालेतील सहावे पुष्प गुंफताना प्रा. पानसे बोलत होते. सोमवारी प्रा. पानसे यांनी ‘परिवर्तनासाठी नवा शिक्षण विचार’ या विषयावर प्रबोधन केले. तत्पूर्वी प्रा. पानसे यांचा परिचय प्रा. नारायण कुळकर्णी-कवठेकर यांनी करू न दिला. पाहुण्यांचे स्वागत प्रा. सुरेश ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अनुराग मिश्र यांनी केले.सध्या आपल्याकडील शालेय शिक्षण अतिशय वाईट आहे. पाचवीच्या विद्यार्थ्याला दुसरीचे काही येत नाही, असे चित्र असल्यामुळे शिक्षणात परिवर्तनाची गरज आहे. शिक्षणाशी संबंधित असणार्या शिक्षक, पालक, शाळा संस्थापक असे सर्व घटकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. तसेच आजच्या शिक्षण पद्धतीत मूलभतू परिवर्तन करणे आवश्यक आहे. शिक्षण हे नेहमी शिकणार्यांच्या जीवनासाठी असते. केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता नसते. शिक्षण हे नेहमी प्रवाही असावे लागते. विसाव्या शतकातील शिक्षण एकाच पठडीतील आहे. एवढचं नव्हे, तर पुढली पिढीही तेच शिक्षण घेत आहे. विसाव्या शतकाचे स्वरू प असे होते, की तो काळ औद्योगिक काळ होता. औद्योगिक काळात जो एकवेळा एक काम करीत होते. आयुष्यभर तेच काम त्याला करावे लागत असे. विसाव्या शतकातील शैली परिवर्तनवादी होती. मात्र, एकविसाव्या शतकात वर्तनवादी झाली. जीवनशैली वेगाने बदलत असली, तरी शिक्षण मात्र तेथेच अडकले, अशी खंत प्रा. पानसे यांनी व्यक्त केली.शिक्षक वर्गात मुलांना चांगले शिकवितात, पण ते केवळ विषय शिकवितात. मुलांना शिकवित नाही. शिक्षक शिकवितो. मुले समोर असतात. शिक्षक मुलांना विषय शिकविण्याची जबाबदारी घेतो; पण मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेत नाही. किती शिक्षक शिकविताना मुलांच्या मानसिक, सामाजिक क्षमतांचा विचार करतात. मुलांची आकलन क्षमतेचाही विचार करीत नाहीत. आकलनशास्त्र सध्याच्या शिक्षण पद्धतीतील मोठ देणगी असल्याचे प्रा.पानसे म्हणाले.-
शिक्षण हे भूतकाळासाठी नाही, भविष्यकाळासाठी असते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:17 AM
अकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते. मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा व्याख्याते प्रा. रमेश पानसे (पुणे) यांनी मांडले.
ठळक मुद्देनवरात्र व्याख्यानमाला पुष्प सहावे