उच्चश्रेणी मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या संवर्गातील शेकडो पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांत अनेक पात्र शिक्षक पदोन्नतीच्या लाभाअभावी सेवानिवृत्त झाले,शिवाय साहाय्यक शिक्षक संवर्गात पदे अतिरिक्त असल्याने अनेक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीही प्रभावित झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडश्रेणी प्रश्न प्रलंबित आहे. अनेक पात्र शिक्षक निवडश्रेणीच्या लाभाशिवाय सेवानिवृत्त झाले. १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करणे, डीसीपीएस धारक शिक्षकांची आजपर्यंत झालेली कपात निश्चित करून वर्षे निहाय डीसीपीएसच्या पावत्या शासन हिस्स्यासह तत्काळ देण्यात याव्यात. यासह इतर समस्यांबाबत मंगळवारी राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी सभापती पांडे गुरूजी यांनी शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षण समिती सदस्य राम गव्हाणकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्यवाह सचिन काठोळे, श्याम कुलट, सुनील माणिकराव, देवेंद्र वाकचवरे, चंद्रशेखर पेठे, नितीन बंडावार,विजय वाकोडे, बिपीन कुरई,धर्मेन्द्रसिंग चव्हाण, मनोज वाडकर,गजानन शेवलकर, विष्णू झामरे, शिवशंकर अस्वार, सुभाष ढोकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो: