अकोला : शहरांमध्ये लख्खं उजेड देणाºया एलईडी पथदिव्यांसाठी राज्य शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीच्या कामकाजावर शिक्कामोर्तब केले आहे. तसे निर्देश महापालिकांना देण्यात आले असून, यानंतर महापालिका क्षेत्रात एलईडीसाठी थेट ईईएसएल कंपनीच्या माध्यमातून पथदिवे उभारणीचे काम केले जाणार आहे.सोडियम पथदिव्यांमुळे महापालिकांना भरमसाठ वीज देयक अदा करावे लागत होते. शिवाय पिवळसर प्रकाशामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. वीज देयकांवर उपाय म्हणून ‘सीएफएल’ पथदिव्यांचा पर्याय समोर आला. यामुळे विजेची बचत होणार असल्याचा दावा केला जात होता. राष्ट्रीय महामार्ग, शहरातील प्रमुख रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील सीएफएलचे पथदिवे लावण्यात आले. कालांतराने सीएफएलच्या अंधुक उजेडामुळे नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली. यावर उपाय म्हणून एलईडीचा वापर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. एलईडीचा लख्ख उजेड व विजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने ‘ईईएसएल’ कंपनीची निवड केली. राज्यातील आठ महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीच्या माध्यमातून पथदिवे उभारल्या जाणार आहेत. तसे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत.महापालिकांसमोर पेच!शहरात एलईडी पथदिवे उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींना शासनाकडून दहा-दहा कोटींचा निधी मिळाला. त्यामध्ये महापालिकांनी १४ व्या वित्त आयोगाचे दहा कोटी असे एकूण २० कोटी रुपयांत एलईडी पथदिव्यांचा कंत्राट दिला. खासगी कंपन्यांनी पथदिवे उभारणीचे काम सुरू केल्यानंतर आता शासनाने ईईएसएल कंपनीला काम देण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीतील काम बंद करायचे की सुरू ठेवायचे, असा पेच महापालिकांसमोर निर्माण झाला असून, यासंदर्भात अकोला महापालिका शासनाचे मार्गदर्शन घेणार आहे.
राज्यातील आठ महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिव्यांसाठी ‘ईईएसएल’वर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:07 PM
अकोला : शहरांमध्ये लख्खं उजेड देणाºया एलईडी पथदिव्यांसाठी राज्य शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीच्या कामकाजावर शिक्कामोर्तब केले आहे.
ठळक मुद्देविजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने ‘ईईएसएल’ कंपनीची निवड केली. राज्यातील आठ महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीच्या माध्यमातून पथदिवे उभारल्या जाणार आहेत.तसे निर्देश महापालिकांना देण्यात आले असून, ईईएसएल कंपनीच्या माध्यमातून पथदिवे उभारणीचे काम केले जाणार आहे.