लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काही वर्षांपूर्वी शेती व्यवसाय श्रेष्ठ समजला जात होता. व्यापार मध्यम आणि नोकरी कनिष्ठ अशी परिस्थिती होती; परंतु आता उलट झाले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. शेतीला पूरक व्यवस्था उभी झाली नाही. सिंचनाची व्यवस्था झाली नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सा पडला; परंतु आता जिल्हय़ातील सिंचनाच्या प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्षभरामध्ये शेतकर्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असे सांगत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शे तकर्यांनी शेतीसोबतच जोडधंद्यांकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले आणि जिल्हय़ात प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला सोमवारी दुपारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत भाजपच्या विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अँड. मो तीसिंह मोहता, भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, शरद झांबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अँड. मोतीसिंह मोहता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील, शिवाजी म्हैसने, डॉ. गजानन काकड, उज्ज्वल ठाकरे, प्रकाश कळंब, शिवराव राखोंडे, मधुकर सरप, राजू महल्ले, कैलास शहापूरकर, सुरेश राऊत, श्रीकृष्ण बिल्लेवार, श्रीकृष्ण माळी, नीलेश मरकाडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
ज्येष्ठ शेतकर्यांना पेन्शन लागू करावी - सिरस्कारबाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला सोमवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी हिताचा विचार होणे गरजेचे आहे; परंतु शासन शेतकर्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी संपला पाहिजे. या दृष्टिकोनातूत कृषीविषयक धोरणे राबविली जात आहेत. शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या शेतीचा विकास झाला पाहिजे, यासाठी काम करण्याची गरज आहे. शासकीय कर्मचार्यांना सेवानवृत्तीनंतर पेन्शन मिळते, तशीच पेन्शन आमच्या ज्येष्ठ शेतकर्यांसाठी लागू झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत आमदार बळीराम सिरस्कार यांनी व्यक्त केले.
शेतकर्यांचे संघटन मजबूत व्हावे - मसनेधर्मादाय आयुक्त के.व्ही. मसने यांनी बोलताना शेतकरी जाती-धर्मात विभागल्या गेला आहे. यातून बाहेर पडून शेतकर्यांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. शेतकर्याला स्वावलंबी बनविण्यासाठी ध्येय-धोरणे राबविण्याची गरज आहे, असे मत मांडले.