अकोट: तालुक्यात उंची, वजन वयानुसार एकूण ८ बालके कुपोषित असल्याचे आढळले आहेत, तसेच ६२ बालके तीव्र कुपोषणाच्या मार्गावर आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुपोषण असताना आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी मात्र दांडी मारण्यात व्यस्त आहेत.
पुनर्वसित गावांमध्ये १३ बालके कुपोषित मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट उपविभागात पुनर्वसित गावांची पाठ कुपोषणाने सोडलेली नाही. धारगड, सोमठाणा, केलपाणी बु., गुल्लरघाट, धारगड, अमोणा, बारुखेडा, नागरतास या आठ गावात १३ बालके कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत तर ७३ बालके मध्यम श्रेणीत असल्याची अकोट येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाची मे २०१९ पर्यंतची माहिती आहे.