शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७३५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६३० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड येथील सात, खडकी येथील सहा, मोठी उमरी व पारस येथील प्रत्येकी पाच, कच्ची खोली येथील चार, मलकापूर, आदर्श कॉलनी व विवरा येथील प्रत्येकी तीन, रजपूतपुरा, सिव्हिल लाईन, गौतम नगर, डाबकी रोड, मोठा राम मंदिर, आश्रय नगर, संताजी नगर, रमेश नगर, पक्की खोली व भंडारज बु. येथील प्रत्येकी दोन, देशमुख पेठ, जुने आळसी बाजार, मेहबूबनगर, वारेगाव मंजू, टॉवर चौक, कृषी नगर, जुने शहर, राणी हेरिटेज, भगीरथ नगर, लहान उमरी, खोलेश्वर, जठारपेठ, दुर्गाचौक, सुधीर कॉलनी, बाळापूर रोड, भरतपूर ता. बाळापूर, मो. अली रोड, जैन मंदिर, देवी खदान, नागपुरी जिन, दामिनी हॉस्पिटल मागे, केशवनगर, हिरपूर ता. मूर्तिजापूर, मालीपुरा, अकोटफैल, रणपिसे नगर, पैलपाडा, रामनगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, खदान, हिंगणा रोड, गोरक्षण रोड, तांडाली, महात्मा फुले, कीर्तीनगर व बलवंत नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी आलेगाव येथील दोन, मुंडलेश्वर, पातूर, खडकी, न्यू आळसी प्लॉट, निभांडेपोस्ट, राजपूत पुरा, राजीव गांधी नगर, कावसा व दगडपारवा ता.बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
चार महिला, चार पुरुष दगावले
डाबकी रोड येथील ५० वर्षीय महिला, मूर्तिजापूर येथील ७० वर्षीय महिला, गॅलेक्सी पार्क, हिंगणा येथील ८२ वर्षीय पुरुष, शिवणी येथील ९२ वर्षीय महिला, पंचशीलनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, देशमुख फैल येथील ७१ वर्षीय पुरुष, रणपिसे नगर येथील ८० वर्षीय पुरुष व खोलेश्वर रोड, अकोला येथील ९० वर्षीय महिला अशा आठ जणांचा उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला.
३५३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील एक, युनिक हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील तीन, आयकॉन हॉस्पिटल येथील एक, हारमोनी हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर येथील दोन, ओझोन हॉस्पिटल येथील चार, समाज कल्याण वसतिगृह येथील सात, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील आठ, इंदिरा हॉस्पिटल येथील दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील चार, तर होम आयसोलेशन येथील २७८, अशा एकूण ३५३ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३,७४७ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१,०२६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २६,७६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५१६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.