अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी आणखी ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण महापालिका क्षेत्रात असून, शुक्रवारी मनपा क्षेत्रात १८४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालानुसार ३८३ अहवाल आरटीपीसीआर चाचणीचे, तर १८१ अहवाल रॅपिड चाचणीचे आहेत. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये अकोट तालुक्यातील टाकळी बु. येथील ३५ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. यासह बार्शिटाकळी तालुक्यातील काजळेश्वर ७० वर्षीय पुरुष, भवानी पेठ येथील ५१ वर्षीय पुरुष, अकोट तालुक्यातील अशोक नगर येथील ५३ वर्षीय महिला, जुने शहर येथील २४ वर्षीय महिला, कौलखेड येथील ७१ वर्षीय पुरुष, जुने शहर येथील ५५ वर्षीय महिला, सिव्हील लाईन येथील ७० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. शुक्रवारी ३०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, यापैकी १८७ रुग्ण गृह विलगीकरणातील आहेत. सद्यस्थितीत ६४२२ रुग्णांवर उपचार सुरू असून, २९,६७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६,७०९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यापैकी ६१० जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय रुग्ण
तालुका - रुग्णसंख्या
मुर्तिजापूर - २९
अकोट - ५४
बाळापूर -२९
तेल्हारा -११
बार्शिटाकळी -१८
पातूर -२०
अकोला -२२२ (ग्रामीण-३८, मनपा -१८४)