अकोला: पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अकोल्यातील आठ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते. सोमवारी महाराष्ट्र दिनी झालेल्या समारंभामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या उपस्थितीत आठ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश वासुदेव दानकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद प्रल्हाद वाघमारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिवाकर वासुदेव नांदगाये, आरपीटीएसचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र दामोदर, पोलीस नाईक मनोज गोपाळ मंगरूळकर, पोलीस जमादार शेख इकबाल शेख इस्माईल, पोलीस जमादार शेख इरफान शेख मजरोद्दीन, पोलीस जमादार प्रशांत वासुदेव पाटील या आठ पोलीस कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह पालकमंत्री रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
आठ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह
By admin | Published: May 02, 2017 1:34 AM