अकोला : दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे राबविण्यात येत असलेल्या मतदार साक्षरता अभियान २०१९ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली. यावेळी दिग्दर्शक तथा अभिनेता विक्रांत बदरखे यांनी दिव्यांग मतदार, युवा व इतर मतदारांशी थेट संवाद साधत मतदानाविषयी जनजागृती केली.निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, नागरिकांमध्ये मतदानाची जागृती व्हावी, यासाठी दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे मतदार साक्षरता अभियान २०१९ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १७ आॅक्टोबर या एकाच दिवशी तब्बल २५ ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती, प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले. यावेळी आठ हजारांपेक्षा जास्त मतदारांनी कुटुंबीयांसह मतदानाचा संकल्प करून शपथ घेतली. राष्ट्रनिर्मितीसाठी सामाजिक एकता व महिला सक्षमीकरण, मतदार साक्षरता, दिव्यांगांकरिता मतदान जनजागृती, मतदानासाठी येणाऱ्या अडचणी, मतदानाचे महत्त्व, मतदार साक्षरता गीत आदींबाबत जनजागृती, सामाजिक प्रबोधन करून मतदार अभिवचनपत्र भरून घेण्यात आले. यावेळी अभिनेता तथा दिग्दर्शक विक्रांत बदरखे, प्रा. विशाल कोरडे, देवीदास चव्हाण, शिवाजी भोसले, स्वाती मेश्राम, शीतल रायबोले, प्रसन्न तापी, गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, विजय कोरडे, श्रीकांत तळोकार, कार्तिक काळे, सुरभी दोडके, वैष्णवी गोतमारे, दिव्या चव्हाण, राघव बैयस, मोनाली देव, अरविंद देव, गजानन मानकर, अक्षय प्रांजळे, सौरभ वाकोडे, अक्षय राऊत, भाग्यश्री इंगळे, पूर्वा धुमाळे, माधुरी तायडे, राजेंद्र सोनकर, प्रा. संजय तिडके, श्रीकांत कोरडे, तृप्ती भाटिया, प्रतिभा नागदेवते, प्रीती भगत, मनोज गाडगे, स्मिता अग्रवाल आदींसह दिव्यांग आर्ट गॅलरीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.दरम्यान, दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतली. यावेळी त्यांनी दिव्यांग आर्ट गॅलरीचे सदस्य तसेच दिग्दर्शक विक्रांत बदरखे व प्रा. विशाल कोरडे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
मतदार साक्षरता अभियानांतर्गत आठ हजार मतदारांनी घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:07 PM