लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला तिच्याच घरातील रोख व दागिने पळविण्यासाठी प्रवृत्त करणार्या दोन युवकांसह सदर मुलीविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. पोलिसांनी गौरव गिरी व प्रतीक काळे नामक दोन युवकांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पत्रकार कॉलनीमधील रहिवासी एक कुटुंबीय २0 ऑक्टोबर रोजी कुलदेवतांचे पूजन करीत असताना त्यांच्या लक्षात आले, की चांदीच्या देवाची मूर्ती देवघरातून गायब आहे. यासंदर्भात त्यांनी कुटुंबातील सर्वच सदस्यांना विचारणा केली; मात्र कुटुंबीयांकडून नकारात्मकच उत्तर मिळाले. त्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ यांना घरी बोलाविले. घरात चोरी झाल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे तुम्ही ठेवलेले स्वत:चे दागिने आपल्या घरी घेऊन जा. त्यानंतर त्यांनी कपाटामधील त्यांच्या भावाचे दागिने काढून देण्यासाठी गेले असता कपाटात एकही दागिना त्यांना मिळाला नाही. ६0 हजार रुपये किमतीचे २0 ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन किलो चांदीचे जुने दागिने किंमत ४0 हजार रुपये तथा ५0 हजार रुपये रोख त्यांना कपाटात दिसलेच नाही. त्यांनी घरातील लहान मुलीला विश्वासात घेऊन दागिने व रोख रकमेची विचारणा केली असता तिने दागिने व रोख ताईने नेल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी दागिने पळविणार्या मुलीस विचारणा केली असता तिने दागिने व रोख पळविल्याची कबुली देत ही चोरी गौरव मुकुंद गिरी व त्याचा मित्र प्रतीक काळे याच्या सांगण्यावरून केल्याचे वडिलांना सांगितले. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तिला सोबत घेऊन सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गौरव गिरी, प्रतीक काळे व मुलीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गौरव गिरी, प्रतीक काळे या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोल्यातील अल्पवयीन मुलीस प्रेम जाळय़ात अडकवून पळविला ऐवज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 2:06 AM
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला तिच्याच घरातील रोख व दागिने पळविण्यासाठी प्रवृत्त करणार्या दोन युवकांसह सदर मुलीविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. पोलिसांनी गौरव गिरी व प्रतीक काळे नामक दोन युवकांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ठळक मुद्देमुलीसह दोन युवकांविरुद्ध गुन्हा