शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
3
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
4
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
5
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
6
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
7
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
8
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
9
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
10
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
11
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
12
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
13
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
14
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
15
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
16
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
17
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
18
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
19
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
20
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

शंकरबाबांच्या दिव्यांग मानसपुत्राला अकोल्यातील वृद्ध दाम्पत्यांची एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:45 PM

अकोला : अनाथ आणि गतिमंदांंचे नाथ म्हणून राज्यभरात ओळखल्या जाणारे शंकरबाबा पापडकर यांचे दिव्यांग मानसपुत्र विदूर, या २३ वर्षीय पदवीधर युवकांचा शैक्षणिक वारसा स्वीकारत अकोल्यातील वृद्ध दाम्पत्य विमल आणि अ‍ॅड. देवीदास पिंपळे यांनी एक लाख रुपयांची भरीव मदत केली आहे.

- संजय खांडेकरअकोला : अनाथ आणि गतिमंदांंचे नाथ म्हणून राज्यभरात ओळखल्या जाणारे शंकरबाबा पापडकर यांचे दिव्यांग मानसपुत्र विदूर, या २३ वर्षीय पदवीधर युवकांचा शैक्षणिक वारसा स्वीकारत अकोल्यातील वृद्ध दाम्पत्य विमल आणि अ‍ॅड. देवीदास पिंपळे यांनी एक लाख रुपयांची भरीव मदत केली आहे. पिंपळे दाम्पत्यांनी केलेली सढळ मदत समाजासाठी आदर्शासोबतच डोळ्यात अंजन घालणारी सिद्ध होत आहे.परतवाडा तालुक्यातील वत्झर येथील स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृहाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबांच्या आश्रमातील दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेला मानसपुत्र विदूर याने नुकताच समाजसेवा विषयांतून पदवी मिळविली. ‘एमपीएससी’च्या माध्यमातून त्याला वरिष्ठ अधिकारी व्हायचे आहे. एकीकडे अनाथ असलेल्या १२३ मुला-मुलींचा सांभाळ आणि दुसरीकडे दिव्यांग असलेल्या या मुलाच्या डोळ्यात भविष्याचे स्वप्न. जिथे दररोजच्या दानापाण्याची सोय नाही, तिथे या मुलाला उच्चशिक्षण द्यायचे तरी कसे, या विवंचनेत सापडलेल्या शंकरबाबांनी नेहमी आश्रमाला साथ देणाऱ्यांना आवाहन केले. शंकरबाबांच्या हाकेला साद देत अकोल्यातील जुन्या काळातील केमिस्ट आणि अ‍ॅड. देवीदास पिंपळे (८८) यांनी एक लाखाची मदत करण्याचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे शंकरबाबांचा मानसपूत्र विदूर पापडकर आणि आश्रमाचे व्यवस्थापक जयगुरू मुंदेकर शुक्रवारी अकोल्यात पोहोचले. कोणताही परिचय नाही. पत्ता माहीत नसताना केवळ सेल्युलर मोबाइल फोनवरून हे दोघे जवाहर नगरातील पिंपळे यांच्या निवासस्थानी शोध घेत पोहोचले. घराच्या बाहेरदेखील फारसे पडू न शकणाºया या वृद्ध दाम्पत्यांनी सेंट्रल बँक खात्याचा एक लाखाचा धनादेश या अनाथ-दिव्यांग असलेल्या विदूरच्या हाती दिला. अ‍ॅड. देवीदास आणि विमल हे वयोवृद्ध दाम्पत्य एकमेकांना आधार देत तर जगत आहेच, सोबतच सामाजिक भान ठेवून त्यांनी विदूरसारख्या दिव्यांग मुलाला मदत करून भविष्याची दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.मला आणि माझ्या भावंडांना फडणवीस सरकारने मदत करावी!पितृत्वाच्या जबाबदारीतून पिंपळे दाम्पत्यांनी दिलेले ऋण कधीही विसरणार नाही. जेव्हा अधिकारी होईल, तेव्हा गोरगरिबांना आणि शंकरबाबांच्या लेकरांना मदत करण्यासाठी आयुष्य खर्च करीन. समाजातून तर आम्हाला मदत होते; पण राज्याच्या फडणवीस सरकारनेदेखील मला आणि माझ्या भावंडांना मदत करावी, किमान नोकरी देऊन जगण्याचे बळ द्यावे, अशी प्रतिक्रिया विदूर शंकरबाबा पापडकर याने व्यक्त केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक