लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपाचे नगरसेवक अनिल गरड यांनी एसटी महामंडळासोबतच निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. गरड यांनी मनपाची निवडणूक लढण्यापूर्वी महामंडळाची पूर्वपरवानगी तर घेतलीच नाही, शिवाय विजयी झाल्यानंतर महामंडळात सेवारत पदाचा राजीनामासुद्धा दिला नाही. या प्रकरणी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली असता सुनावणीअंती विभागीय आयुक्तांनी गरड यांना अपात्र घोषित केल्याची माहिती शिवसेना नेते विजय मालोकार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.एसटी महामंडळात सेवारत असताना भाजपाचे नगरसेवक अनिल गरड यांनी स्वायत्त संस्थेची निवडणूक लढवल्याप्रकरणी तक्रारकर्ते विजय मालोकार यांनी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्याकडे याचिका दाखल केली होती. या प्रकरणी ३ जून रोजी सुनावणी पार पडली असता, विभागीय आयुक्तांनी नगरसेवक गरड यांना अपात्र करण्याचा आदेश जारी केला. यासंदर्भातील भूमिका विजय मालोकार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. एसटी महामंडळात सेवारत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक लढण्यापूर्वी महामंडळाची पूर्वपरवानगी घेणे क्रमप्राप्त असून, निवडणुकीच्या निकालानंतर महामंडळातील पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. गरड यांनी महामंडळातील पदाचा राजीनामा न देता निवडणूक लढवली. या प्रकरणी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे दस्तावेज सादर केल्याची माहिती मालोकार यांनी दिली.गरड काँग्रेसचे पदाधिकारी!एकीकडे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणारे अनिल गरड, दुसरीकडे एसटी महामंडळात काँग्रेसप्रणित इंटक युनियनचे विभागीय अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी असताना गरड यांना भाजपने तिकीट दिल्याची माहिती विजय मालोकार यांनी दिली.
एसटी महामंडळासोबतच निवडणूक आयोगाची फसवणूक
By admin | Published: June 08, 2017 1:38 AM