लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गच्चीवर खेळताना एका ८ वर्षीय शे. सुफान शे. कयुम या चिमुकल्याला जवळूनच गेलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तीन महिलांनासुद्धा विजेचा धक्का लागून त्या गंभीर भाजल्या गेल्या. या चौघांनाही पुढील उपचारार्थ अकोला येथे रवाना करण्यात आले असून, शे. सुफान शे. कयुमची प्रकृती गंभीर आहे.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४५ वाजताचे सुमारास महिला कपडे धूत असताना शे. सुफान शे. कयुम हा बाजूला खेळत होता. त्याचा स्पर्श जवळून गेलेल्या विद्युत तारेस झाल्याचे लक्षात येताच, रेशमा परवीन शे. कयुम (४0), आसमा परवीन शे. नईम (२४), हिना परवीन करीम खान (२0) यांनी त्याला वाचविण्यासाठी स्पर्श करताच त्यांनासुद्धा विजेचा जोरदार धक्का लागून, त्या गंभीर भाजल्या गेल्या. चौघांनाही स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले असून, शे सुफान शे. कयुम याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. यावेळी सामाजिक कार्यकर्ता शे. इमराज शे. खलील, अबद्दुला अमान टेलिकॉमचे संचालक समीरखान अब्दुल रफीक यांनी जखमींना मदत केली.
विजेच्या धक्क्याने चौघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:47 AM
मूर्तिजापूर : गच्चीवर खेळताना एका ८ वर्षीय शे. सुफान शे. कयुम या चिमुकल्याला जवळूनच गेलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तीन महिलांनासुद्धा विजेचा धक्का लागून त्या गंभीर भाजल्या गेल्या.
ठळक मुद्देमूर्तिजापुरातील घटना आठ वर्षीय मुलाचा समावेश