अकोट शहरात १ मार्च रोजी थकीत वीज देयक वसुलीसाठी महावितरणचे सहायक अभियंता अरुण जाधव, अकोट शहरचे कर्मचारी योगेश वाकोडे, नंदकिशोर वानखडे, नीलेश दिंडोकार, गोपाल केदार, अकोट शहरातील बागवानपुरा येथील जनाब सत्तार खा मुसे खा याच्या घरी थकीत वीज देयक वसुलीसाठी गेले असता, त्याने वीज देयक भरण्यास नकार दिला. सहायक अभियंता यांनी गोपाल केदार यांना सदर ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी इलेक्ट्रिक पोलवर चढण्यास सांगितले. नदीम खान
अयुब खान याने गोपाल केदार यांना इलेक्ट्रिक पोलवरून खाली ओढले. कर्मचा-याचे शर्ट फाटले. शिवीगाळ करीत पथकातील कर्मचाऱ्यांना जीवाने मारण्याची धमकी देत, सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये सहायक अभियंता अरुणकुमार रामसिंग जाधव यांच्या तक्रारीनुसार आरोपी नदीम खान अयुब खान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ५०४, ५०६ गुन्हा दाखल केला.