अकोला: मागील दहा ते बारा दिवसांपासून जुने शहरात विजेचा लपंडाव सुरू असून, रात्र होताच विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. महावितरण कंपनीच्या कारभारामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांचा संयम संपत चालला असून, बुधवारी भाजपने तर गुरुवारी शिवसेनेच्यावतीने महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. रात्री-अपरात्री बंद होणारा वीज पुरवठा सुरळीत न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.जुने शहराला वीज पुरवठा करणारी केबल तुटल्यामुळे मागील काही दिवसांपासून या भागात रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचा प्रकार समोर येत आहे. ही केबल दुरुस्त करण्यासाठी महावितरणक डे सक्षम यंत्रणा नसल्यामुळे त्याचा मानसिक त्रास वीज ग्राहकांना सहन करण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. या प्रकाराची दखल घेत बुधवारी भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांची भेट घेऊन वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे सूचित केले. यावेळी उपमहापौर वैशाली शेळके, नगरसेविका रंजना विंचनकर, सारिका जयस्वाल, नीलेश निनोरे व श्याम विंचनकर आदी उपस्थित होते.शिवसेनेचा घेराव; सेना स्टाइल आंदोलनाचा इशारासायंकाळ होताच प्रभाग १० मधील शिवचरणपेठ, श्रीवास्तव चौक, वीर हनुमान चौक, विठ्ठल मंदिर परिसर, मुंगसाजी गल्ली, कोठारी हॉस्पिटल, जयहिंद चौक, काळा मारोती परिसर, अगरवेस, खिडकीपुरा आदी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होत असून, रात्रभर पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांवर जागरण करण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी प्रभागाच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांच्यासह शिवचरणपेठस्थित ३३ केव्हीच्या उपकें द्रावर धडक देत कार्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांना घेराव घातला. पुन्हा विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सेना स्टाइल आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा सज्जड इशारा यावेळी महावितरणचे उपविभागीय अधिकारी वामन लिखारे यांना देण्यात आला. याप्रसंगी सेनेच्या जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, लीला बुंदेले, मंदा दांदळे, अर्चना ढवळे, रत्नमाला गाढे, भाग्यश्री कोल्हे, कुसुम कुटाफळे, माया मोहरील, वंदना गिरी, वैष्णवी गिरी, वीणा वानखडे, अमृता वडसिंगीकर, माया ढोरे, मीरा वडी, विठ्ठलराव राऊत, वैभव गासे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.मनपाच्या खोदकामामुळे वीज खंडितशहराच्या कानाकोपºयात मनपाच्यावतीने पाणी पुरवठ्याचे जाळे टाकण्याचे काम केले जात आहे. संबंधित कंत्राटदाराच्या मनमानी खोदकामामुळे जुने शहराला विद्युत पुरवठा करणारी केबल तुटल्याचा दावा भाजप पदाधिकाºयांशी चर्चेदरम्यान महावितरणकडून करण्यात आला. ही बाब लक्षात घेता भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. विद्युत केबल तुटल्यानंतर संबंधित कंत्राटदार महावितरणला अवगत करीत नसल्याच्या मुद्यावर किशोर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.