लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घरगुती ग्राहकांसह वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज वापर करणाºया जिल्ह्यातील ग्राहकांकडे आजरोजी (३० जुलै) २२ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून सदर रक्कम वसूलीची धडक मोहिम महावितरणने हाती घेतली आहे. त्यानुसार, शेकडो थकबाकीदारांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी.तायडे यांनी सोमवारी दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वाशिम जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे २ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक वीज ग्राहक आहेत. ५४ गावठाण फिडरवरून ग्रामीण भागात; तर ९ फिडरवरून शहरी भागात विजपुरवठा केला जातो. त्यापैकी आजमितीस सुमारे ५० हजार ग्राहकांकडे विज देयकांची थकबाकी असून हा आकडा २२ कोटी रुपयांच्या आसपास पोहचला आहे. दरम्यान, सदर रक्कम वसूल करित असताना महावितरणची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे जे ग्राहक देयकांचा भरणा करण्यास टाळाटाळ करित आहेत, त्यांच्यावर वीज कपातीची कारवाई केली जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील शेकडो थकबाकीदारांचा विद्यूत पुरवठा खंडित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:12 PM
वाशिम : घरगुती ग्राहकांसह वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज वापर करणाºया जिल्ह्यातील ग्राहकांकडे आजरोजी (३० जुलै) २२ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून सदर रक्कम वसूलीची धडक मोहिम महावितरणने हाती घेतली आहे.
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे २ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक वीज ग्राहक आहेत. ५० हजार ग्राहकांकडे विज देयकांची थकबाकी असून हा आकडा २२ कोटी रुपयांच्या आसपास पोहचला आहे.