अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत ३ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला मंडलातील अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि अकोट विभागात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार एकूण २४० जणांवर तर कलम १२६ नुसार एकूण १६ ग्राहकांवर अशा एकूण २५६ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४६ लाख रुपयांची वीज चोरी व गैरप्रकार झाल्याचे निदशर्नास आले आहे.वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत आणि अकोला परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या निदेर्शानुसार सर्व कार्यकारी अभियंते यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी कर्मचारी व जनमित्र सहभागी असलेल्या टीम निर्माण करून या मोहिमेत सहभाग घेतला.अकोला मंडळातील अकोला शहर विभागात २५, अकोला ग्रामीण विभागात १३४ आणि अकोट विभागात ८१ अशा एकूण २४० जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून १४८ ग्राहक तर थेट आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ९२ जणांचा समावेश होता. विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसºया कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्यामध्ये अकोला शहर विभागात ३, अकोला ग्रामीण विभागात ११, अकोट विभागात २ ग्राहकांवर एकूण १६ ग्राहकांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. अशा एकूण २४५ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४२ लाख रुपयांची वीज चोरी व गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या मोहिमेमध्ये पथकांनी जिल्हातील शहरे व ग्रामीण भागामध्ये तपासणी केली, तसेच संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.