अकोला : शहरातील अकोट फैल भागात महावितरणने केलेल्या कारवाईत ३१ ठिकाणी वीज चोरी उघड झाल्या असून ,यात १० लाखापेक्षा जास्त रूपयाची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणला लागलेल्या वीज चोरीच्या या कीडेला नष्ट करण्यासाठी यानंतर वीज चोरी विरोधात सतत कारवाईचे निर्देश अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी दिले आहे.अकोला शहर विभागाअंर्गत अकोट फैल भागात नोव्हेंबर महिन्यात वीजचोरी विरोधात धाडसत्र राबवत ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी याच्या नेतृत्वात महावितरण भरारी पथक व अकोला शहर उपविभाग तीन यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत १ लाख ५ हजार ९०२ युनिट म्हणजेच १० लाख रूपयापेक्षा जास्त रूपयाची वीज चोरी झाल्याचे उघड करण्यात आले.वीज चोरीमुळे वीजेचा भार कमी जास्त होणे , वारंवार शार्टसर्किट होणे, आग लागणे ,रोहीत्र जळणे असे प्रकार होत असल्याने अखंडित सेवा देण्यास महावितरणला अडथळा निर्माण होतो. शिवाय महावितरणची वितरन हानी वाढून आर्थीक नुकसानही होते. त्यामुळे यापुढे आकस्मिक आणि सतत कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अभियंता अनिल डोये यांनी दिले आहे. वीज चोरीची ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात अतीरिक्त कार्यकारी अभियंते अजितपाल सिंग दिनोरे, संदिप कायंदे, उपकार्यकारी अभियंते संतोष राठोड,अभिजीत पाटील, राजेश लोणकर, अमित मिरगे, सहाय्यक अभियंते लहाने, सानप यांच्यासह तांत्रिक कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.रकमेचा भरणा केल्यास पोलिसात गुन्हानियमानुसार तडजोड रकमेचा व वीजचोरी केलेल्या रकमेचा भरणा न करणाºया ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ कलम १३५ नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.