अकोला, दि. ३0-विज्ञान विषयातील संकल्पना आणि शोध यांचा जीवनाशी असणारा संबंध विद्यार्थ्यांंना कितपत समजला आहे. याचा शोध घेण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. राज्यभरातून दर्जेदार विज्ञान प्रकल्प सहभागी व्हावेत, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रकल्प अधिकाधिक निवडल्या जातील. यासाठी मॉडेल अपग्रेडेशन कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हय़ातून अकरा प्रकल्प सहभागी होणार आहेत. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अकोला एज्युकेशन सोसायटीतर्फे मॉडेल अपग्रेडेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले. ४२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये बाल वैज्ञानिक प्राथमिक विभागातून प्राजक्ता बेलाडकर, जान्हवी इंगोले, आस्था ओमप्रकाश पांडव, अमोल शेषराव गावंडे, ऋषिकेश इंगळे, माध्यमिक विभाग अश्विन सुभाष फाटकर, प्रसाद रामेश्वर डवंगे, प्रतीक बाळकृष्ण लोंढे, सागर संतोष उगले आणि शैक्षणिक साहित्य तयार करणारे शिक्षक मोहम्मद अकबर मो. सफदर, विनोद मधुकर पुंडकर, धम्मदीप जनार्दन इंगळे, सुरेश नामदेवराव किरतकार, चंद्रकांत शालीग्राम बोळे, मार्गदर्शक शिक्षक अनिल देवीकर, नितीन गावंडे, रेवती अयाचित, कुशल सेनाड व गोपाल लक्ष्मण काळे सहभागी झाले होते. कॅम्पमध्ये मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संजय देव्हडे, प्रा. डॉ. अर्चना सावरकर, प्रा. डॉ. श्रीकृष्ण सावरकर, प्रा. डॉ. दिलीप बदुकले, प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी विज्ञान प्रकल्पांमध्ये काय सुधारणा कराव्यात, कशी माहिती द्यावी, फलकावर कोणती माहिती द्यावी, यासह इतर विषयांवर मार्गदर्शन केले. कॅम्पदरम्यान अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मांडवगणे, उद्योजक जयंत पडगिलवार, शादरुल दिगंबर, सचिन अमीन, प्राचार्य माधव मुन्शी यांनी भेट दिली. यावेळी एस.बी. जाधव, प्रशांत डबीर, जयंत जोशी, संजय जोशी, तुषार लाखपुरे उपस्थित होते.
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अकरा प्रकल्प
By admin | Published: January 31, 2017 2:39 AM