इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एक सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी राहणार आहे. परीक्षेत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे राहणार आहे. ही परीक्षा ओएमआयवर आधारित असेल. प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, गृहपाठ/ तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांना २० गुण, विद्यार्थ्यांचे ९ वीचे विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण या आधारे विद्यार्थ्यांचे यंदाचे मूल्यमापन करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचे कोविड पूर्वकाळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सीईटी घेणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सीईटीतील गुणांच्या गुणवत्तेच्या आधारे अकरावीसाठी प्रवेश प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशप्रक्रिया संपल्यावर, रिक्त जागा ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहणार आहेत.
सीईटी परीक्षेच्या आधारावर होणार अकरावी प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:15 AM