अकोला : कोळी महादेव जमातीला कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी एल्गार पुकारित आदिवासी कोळी महादेव जमातीच्यावतीने शनिवार, २० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोळी महादेव जमातीला सध्या विशेष मागासवर्ग प्रवर्गाचे (एसबीसी) जात प्रमाणपत्र दिले जात असून, कोळी महादेव जमातीला कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आदिवासी कोळी महादेव जमातीच्यावतीने गेल्या ऑक्टोबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले होते.
त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार ३० आॅक्टोबर रोजी उपोषण मागे घेण्यात आले; परंतू त्यानंतर आतापर्यंत कोळी महादेव जामीतीला जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे कोळी महादेव जमातीला कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आदिवासी कोळी महादेव जमातीच्यावतीने पुन्हा २० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. कोळी महादेव आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅड. मंगेश बुटे, संदीप बगाडे, संजू बुंदे, सचिन वडाळ, राम पाटील म्हातोडीकर, सोनाजी मुकुंदे, दिपक बुंदे, सचिन डांगरे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे....तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार !जोपर्यंत कोळी महादेव जमातीला जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी बोलून दाखविला.