अकोला तालुक्यातील धोतर्डी गावात अवैध दारुबंदीसाठी महिलांनी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागालाही निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली .
धोतर्डी परिसरात जवळपास ४ ते ५ अवैध दारुची दुकाने आहेत. येथे दारूची सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेक युवक दारूच्या आहरी गेले असून व्यसनाधिनता वाढली आहे. त्यामध्ये काहीचा मृत्यूही झाला असल्याचे या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगीतले. व्यवसनामुळे मद्यपी स्वत:च्या घरी गेल्यानंतर कुटुंबीयांना मारहाण, शिविगाळ करतात. तसेच मद्यपींकडून महिलांना-युवतींना छेडछाडी करण्याचेही प्रकार घडले आहेत. आता या प्रकरणात शांत बसण्यापेक्षा आंदाेलनाची भूमिका घेण्याची आमची मानसिकता झाली. त्यामुळे या परिसरातील दारू विक्री बंद करा अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा या महिलांनी दिला.
निवेदन देते वेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मंगला सचिन सिरसाट, आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट,मंदा वाकोडे, विकास सदांशिव,धोतर्डी सरपंच रामेश्वर गोहाडे, उपसरपंच राजेश गायगोळ यांच्यासह यशोधरा चक्रनारायण, सरुबाई वानखडे, सुनिता जाधव, लता तायडे, रूपाली दाभाडे, दिपाली दाभाडे, शारदा मोरे, शारदा इंगळे, शालिनी मोरे, मालिनी वानखडे, दुर्गा हनवते, रंजना जाधव, भिक्कु दाभाडे, बकुबाई मोरे, मायावती वाकपांजर, चित्रा उपऱ्हास, मीना इंगळे, दीपाली ढोके, ज्योती राठोड, उमन लोखंडे, सुनंदा पांडे, वंदना आठवले, सविता हिवराळे, प्रमिला रामचवरे, आशा वानखडे यांच्यासह धोतर्डी येथील महिलांनी केली आहे.