लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकर्यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी तहसीलदारांसह इतर अधिकार्यांचा समावेश असलेल्या समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला जाणार आहे, हे विशेष. योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. त्यामध्ये नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान, कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकर्यांना विशेष योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी थकबाकीदार शे तकर्यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज विविध संकेतस् थळावर सादर केले. २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४८ हजार ४३ शेतकर्यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख ३८ हजार ५४३ शेतकर्यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरले. अर्ज भरलेल्या शेतकर्यांच्या गावनिहाय याद्यांचे चावडी वाचन २७ व २८ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी तालुकास्तरीय समितीचे अधिकारी-कर्मचारी गावात धाव घेणार आहेत. त्यावेळी ज्या शेतकर्यांनी अर्ज दाखल केले, ते लाभासाठी पात्र आहेत की नाही, याची पडताळणी अ ितरिक्त माहिती घेऊन केली जाणार आहे. ती माहिती आल्यानंतर तालुकास्तरीय समितीचे सचिव तालुका उ पनिबंधक पात्र शेतकर्यांची यादी तयार करून अपलोड कर तील.
अर्ज होतील तात्पुरते मंजूर, नामंजूरतालुकास्तरीय समिती प्राप्त अर्जांंपैकी पात्र-अपात्र अर्जापुढे तात्पुरते मंजूर, तात्पुरते नामंजूर आणि नामंजूर असे शेरे मारणार आहे. चावडी वाचनातून पुढे आलेल्या माहितीसोबत बँकेचा तपशिलाचा ताळमेळ घेतल्यानंतर लाभार्थी पात्रतेचा निर्णय होईल. त्यासाठी तालुकास्तरीय समितीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
उपविभागीय समितीपुढे आव्हानएखाद्या शेतकर्याला तालुकास्तरीय समितीने अपात्र ठरवल्यास त्यावर त्याला उपविभाग समितीपुढे दाद मागता येणार आहे. आधी तालुकास्तरीय समितीकडून पूर्ण माहिती मिळाल्यानंतर समाधान न झाल्यास उपविभाग समितीकडे प्र त्यक्ष लेखी किंवा ऑनलाइन गार्हाणे मांडता येणार आहे.
कुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्रएकाच कुटुंबातील (पती-पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये या व्याख्येप्रमाणे) व्यक्तींनी एकच अर्ज करणे आवश्यक आहे. पडताळणीमध्ये अशा कुटुंबाने एकापेक्षा अधिक अर्ज केले असतील, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, ही बाब चावडी वाचनातच सांगितली जाणार आहे. तसेच त्या कुटुंबाला तेथेच अपात्र ठरवले जाणार आहे.
नोकरदार घाबरले.कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय सेवेत असलेल्या शेकडो नोकरदारांनीही अर्ज भरल्याची माहिती आहे. आता गावपातळीवर पडताळणी होत असल्याने इतर माहिती ग्रामस्थांकडून मिळणार आहे. त्यामुळे नोकरदार असलेल्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पडताळणीमध्ये माहिती उघड झाल्यानंतर कारवाई होऊ शकते, अशी भिती त्यांना आहे. त्यासाठी अनेक केंद्र संचालकांना त्यांनी आ पला अर्ज डिलिट करण्याची विनंतीही केली. मात्र, तसे होत नसल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. हा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक केंद्रावर घडल्याची माहिती आहे. त्या नोकरदारांमध्ये पोलिसांचा समावेश मोठय़ा प्रमाणात आहे. -