खेट्री : ग्रामीण भागातून रुग्णांना पुढील उपचारासाठी शहराच्या रुग्णालयात हलविण्यासाठी आपत्कालीन रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहे. आपत्कालीन रुग्णवाहिकेच्या डॉक्टर व चालकांच्या मनमानीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात ये त आहेत.अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांना त्वरित उपचार मिळावा, या उद्देशाने शासनाने आपत्कालीन रुग्ण सेवा सुरू केलेली आहे; परंतु आलेगाव व वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण वाहिका चतारी, खेट्री, पिंपळखुटा, चांगेफळ, चान्नी, सायवणी, विवरा, मळसूर, शिरपूर आदी परिसरात पाठविली जाते; परंतु या आपत्कालीन रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले डॉक्टर व चालकाचा गेल्या काही महिन्यां पासून मनमानी कारभार सुरू असल्याचे आरोप रुग्णांच्या ना तेवाइकांकडून केला जात आहे. डॉक्टर व चालक मनमानी करून स्वत:च्या सुविधेसाठी जवळचा मार्ग सोडून लांब मार्गाने रुग्णवाहिका शहराच्या रुग्णालयात पोहोचवित असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक करीत आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे रुग्णासह त्याच्या नातेवाइकामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. १५ सप्टेंबर रोजी पांगरताटी येथील रूपेश मधुकर गाडवे या रुग्णांनासुद्धा जवळच्या मार्गाने न नेता स्व त:च्या सुविधेसाठी लांब मार्गाने अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे एक तासाऐवजी अडीच तासाचा वेळ लागला होता.
तक्रार केल्यास सेवा बंद करण्याच्या धमक्यारुग्णवाहिकेवर असलेले डॉक्टर व चालक नेहमी किरकोळ कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकाशी वाद घालतात आणि तक्रार केल्यास रुग्णवाहिका सेवा बंद करण्याच्या धमक्या दे तात. त्यामुळे तक्रार करण्यास कुणी पुढे येत नाही. संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.
याबाबतच्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येईल. सदर चौकशीत कुणी दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध निश्चितच कारवाई करण्यात येईल.- डॉ. अभिजित फाटक,जिल्हा मॅनेजर आपत्कालीन रुग्ण सेवा अकोला (पुणे).