अकोला : विजेची वाढती मागणी व प्रत्यक्ष पुरवठा यामधील तफावत वाढत असल्याने गत काही दिवसांपासून महावितरणकडून आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. शनिवारी महावितरणकडून आप्तकालीन भारनियमन करण्यात आल्यानंतर सोमवारी पुन्हा जिल्ह्यात विविध ग्रुपवर आपत्कालीन भारनियमन करण्यात आले. तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना होणाऱ्या या भारनियमनामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत.भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार, ई, एफ, जी १, जी २, जी ३ या ग्रुपवर टप्प्या-टप्प्याने भारनियमन करण्यात आले. यामुळे विविध फिडरवरील वीज पुरवठा दोन ते तीन तास खंडित होता. सध्या उन्हाचा कडाका वाढला असताना नागरिकांकडून विजेच्या उपकरणांचा वापर वाढला आहे. गारवा देणारे कुलर, एसी, पंखे आदी उपकरणे बंद राहिल्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, सायंकाळी सर्वच ग्रुपवरील भारनियमन मागे घेण्यात आले.बाजारपेठ प्रभावितमनपाकडून काही झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच महावितरणकडून काही भागात देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे शहरातील खोलेश्वर, कॉटन मार्केट भागातील फिडरवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील वीज पुरवठा चार ते पाच तास खंडित होता. भर दुपारी वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
आपत्कालीन भारनियमनाने जिल्ह्यातील नागरिक त्रस्त
By admin | Published: April 18, 2017 1:53 AM