शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

उसनवारीच्या पैशातून आपत्कालीन वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:56 AM

अकोला : जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ‘ओ’ देत  तत्काळ धावून जाणारा धेय्यवादी तरुणांचा हा संच. तब्बल १२  वर्षांपूर्वी म्हणजेच वर्षभर कार्यरत असतो. २00३ मध्ये अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने लोकांना जीवन देणार्‍या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

ठळक मुद्देदागिन्यांसाठी जमा केलेल्या पैशाची मदत दात्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ‘ओ’ देत  तत्काळ धावून जाणारा धेय्यवादी तरुणांचा हा संच. तब्बल १२  वर्षांपूर्वी म्हणजेच वर्षभर कार्यरत असतो. २00३ मध्ये अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने लोकांना जीवन देणार्‍या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीच्या जन्माला एक छोटी घटना कारणीभूत ठरलीय. दीपकच्या पिंजर गावातील एका व्यक्तीचा वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही म्हणून मृत्यू झालाय. एक कुटुंब उघडं पडलंय. नेमके याच घटनेच्या अस्वस्थेतून दीपकने पुढचे आयुष्य लोकांना जीवन देण्याच्या कामात खर्ची घालण्याचा निश्‍चय केलाय. त्याच्या या विचाराला गावातील २0 मित्रांनी उचलून धरले अन्  याच विचारातून ‘गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथका’चा जन्म झाला. गेल्या बारा वर्षांपासून एक रुपयाची सरकारी मदत न घेता या पथकाने निरंतर आपला सेवायज्ञ सुरू केलाय. आधी २0 जणांपासून सुरू झालेल्या या चळवळीचा आता वटवृक्ष झाला. सध्या या पथकामध्ये ५५0 सेवक आहेत. त्यापैकी १३0 सेवक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणांनी सज्ज आहेत. ७0 सेवकांना  प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पथकातील जवळपास सर्वच सदस्य सर्वसामान्य घरातील शेती करणारे, मजुरी करणारे, उदरनिर्वाहासाठी स्वत:चा व्यवसाय करणारे आहेत. ते आपल्या दैनंदिन कमाईतला नियमित वाटा या चळवळीला देत असतात. त्यातूनच या कामाचा खर्च भागविला जातोय. तीन-चार वर्षांपासून या पथकाने स्वत:ची अँम्बुलंस गाडी घेतली. या अँम्बुलंसने आतापयर्ंत अनेक रुग्णांना जीवनदान दिले. कधीकधी गाडीत डीझेल भरायचेही वांदे असतात; परवा या पथकाने तीन लाख चाळीस हजाराची जुनी बोलेरो विकत घेतली. ही रक्कम उभी करण्यासाठी २ लाख रुपये गावातून उसने घेतले तर दीपक सदाफळे यांच्या पत्नी राधिका शिवणकाम करतात. त्यानी या कामातून मिळालेल्या पैशातून दागिणे घेण्यासाठी ५0 हजार जमा केले होते. त्यांनी दागिने घेण्याऐवजी ही  रक्कमसुद्धा वाहनासाठी देऊन पतीची सर्वार्थाने ‘अर्धांगिणी’ असल्याचे प्रत्यंतर दिले आहे. 

जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली, नागरिक पाण्यात अडकले किंवा आगीत सापडले, रुग्णाला तातडीने दवाखान्यात पोहोचवायचे, अडकलेल्या वन्य प्राण्याचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’  करायचे, या सर्व संकटांतून बाहेर पडण्याच्या मदतीसाठी फक्त आणि फक्त एकच नाव असतंय, ते म्हणजे  ‘ गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक.  या पथकाच्या ताफ्यात केवळ एकच वाहन आहे आणि तिही रुग्ण्वाहिका. मदतीसाठी कुणाचाही फोन आला की, हे पथक कुठलेही कारण न सांगता मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी धाव घेते, कुठल्याही मोबदल्याची आशा नसताना या पथकाचे असे मदतकार्य अहोरात्र सुरू आहे. या पथकाला आपत्कालीन वाहनाची गरज होती. ही गरज परवा पूर्ण झाली असून, या पथकाचे प्रमुक दीपक सदाफळे यांनी पत्नीने  दागिने घेण्यासाठी जमा केलेले पैसे दिले, तर काही उसनवारी करून वाहनाची खरेदी केली आहे.

संवेदनशील दातृत्वाने पुढे यावे!अकोला जिल्हाच नाही तर उत्तराखंडमधील जलप्रलय असो की माळीणची दुर्घटना, गाडगेबाबा  आपत्कालीन  शोध व बचाव  पथक सर्वच ठिकाणी मदतीसाठी समोर आणि तत्पर होतंय. पुरात अडकलेले लोक असोत की विहिरीत पडलेला बिबट्या, सर्वांना जीवनदान देण्याचे काम या चळवळीने केले आहे. या तरुणांच्या कार्यासाठी संवेदनशिल नागरिकांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. आताही सरकार आणि समाजाने लोकांना जीवनदान देणार्‍या या धेय्यवादी आणि कर्मवेड्या तरुणांच्या चळवळीला बळ आणि ताकद देणे आवश्यक आहे.