शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

संघर्षापेक्षा समन्वयावर भर - आमदार अमोल मिटकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:14 AM

सर्वांशी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करून मला माझ्या पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे, अशी ग्वाही आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला विधान परिषदेवर पाठविले. आता आमदार म्हणून वावरताना जबाबदारीचे जाण अन् भान आहे. पक्षहित सर्वोतोपरी याच न्यायाने काम करताना सामान्यांचा आवाज मला विधिमंडळात पोहचविण्याच्या या प्रवसात सत्तासंघर्ष माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. सर्वांशी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करून मला माझ्या पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे, अशी ग्वाही आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.ल्ल ‘लोकमत’ कार्यालयात त्यांनी मंगळवारी भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझी भूमिका सर्वांना सोबत घेऊनच चालण्याची आहे. सर्वांशी संवाद आहे, पक्षवाढीसाठी जे महत्त्वाचे त्याला प्राधान्य हेच माझे धोरण राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.माझा प्रवास हा ग्रामीण भागातून विधिमंडळापर्यंत झाला आहे. तो संघर्षाचाच आहे. ग्रामीण भागातच वाढलो, शिकलो, तिथेच मोठा झालो, त्यामुळे या भागातील समस्यांची जाण आहे. त्यासाठी नव्याने अभ्यास करण्याची गरज नाही. शासन व प्रशासन यामधील दुवा म्हणून काम करण्यावर माझा भर असल्याने मी हाती घेतलेली समस्या मार्गी लागेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातील अनेक प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे रखडलेले आहेत. सुदैवाने आमच्या पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे या प्रश्नांची तड लावतानाच पर्यटनपूरक रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरनाळा, काटेपूर्णा अभयारण्य, चिखलदरा, अकोट, शेगाव व पुढे अजिंठा असा पर्यटन चतुष्कोन तयार करून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी अनेक योजना संकल्पित आहेत. मिळालेली संधी ही लोकांसाठीच आहे, याच ध्यासातून आमदार झाल्यापासून एकही दिवस विश्रांती न घेता फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार छावणीचा केलेला प्रयोग हा आॅन द स्पॉट निकाल देणारा ठरला आहे. या प्रयोगाची माहिती पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. त्यांनी कौतुक केले, हे फार मोठे बळ आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात का, याबाबतही सतत प्रशासनाच्या संपर्कात राहून समन्वय करत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी शेतकरी नेते कृष्णा अंधारे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड अलोककुमार शर्मा व निवासी संपादक रवी टाले यांनी मिटकरी यांना ‘फ्रीडम आॅफ प्रेस’ ही प्रतिमा देऊन सत्कार केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेस