.........................................................
‘होम आयसोलेशन’मधील रुग्णांची घेतली माहिती !
अकोला : अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी अकोला उपविभागातील गृहविलगीकरणात (होम आयसोलेशन) असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेतली. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवारी दिल्या.
...............................................................
थकीत पाणीपट्टी वसुलीच्या कामाचा आढावा !
अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत थकीत पाणीपट्टी वसुलीच्या कामाचा आढावा शुक्रवारी जिल्हा परिषद अर्थ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. थकीत पाणीपट्टी वसुलीच्या कामाला गती देण्याच्या सूचना या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
............................................................................
रस्त्यांवर गर्दी कायमच !
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होत असताना, शहरातील रस्ते आणि प्रमुख चाैकात होणारी नागरिकांची गर्दी कायमच आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी, रस्त्यांवर गर्दी होत असल्याचे चित्र आहे.