अकोला : पश्चिम विदर्भात २५० वर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, या माध्यमातून गटशेती करण्यासाठी गटशेतीची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. त्याकरिता गटशेतीच्या अनुदानात ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घ्यावे, याकडेही लक्ष देण्यात येत आहे.शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण करण्यासाठी सूक्ष्म मार्गदर्शन करण्यावर कृषी विभागाने भर दिला आहे. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आता ६० टक्के असे भरीव अनुदान देण्यात येणार आहे. वºहाडात २५० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यातील काही कंपन्या चांगले काम करीत आहेत. त्यामध्ये ९८ कंपन्यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील नरनाळा शेतकरी उत्पादक कंपनीचे काम जोरात आहे. अकोट तालुक्यातून केळी व भाजीपाला ही पिके परदेशात निर्यात केली जात आहेत. अकोला जिल्ह्यातून केळी व काही भाजीपाला पिके निर्यात केली जात आहेत. त्यामुळे इतर कंपन्यांना प्रोत्साहन देऊन येथील शेतमाल देशात तसेच परदेशात कसा पाठविता येईल, यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत मुख्यत्वे कापूस, सोयाबीन व तूर ही पिके सर्वाधिक घेतली जात आहेत. शेतकºयांनी या पारंपरिक पिकांसह जे बाजारात विकले जाते, ते शाश्वत पीक घेण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सेंद्रिय, जैविक उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.कांदा, ओवा इतर मसाले पिकांसह रेशीम शेतीसह सुगंधी औषधी वनस्पतीचीदेखील शेतकºयांनी लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन कृषी विभागासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात येत आहे.
गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. गटशेती करू न शेतकºयांनी शाश्वत उत्पादन घेण्यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. निर्यातक्षम शेतमाल तयार करावा, यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत.- मोहन वाघ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अकोला.