...........................................................
निधी मागणीचा प्रस्ताव प्रलंबितच!
अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव अद्याप शासन दरबारी प्रलंबितच आहे. त्यामुळे निधी केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
.............................................................
तहसीलदारांनी घेतली तलाठ्यांची बैठक!
अकोला : तहसीलदार विजय लोखंडे यांनी शुक्रवारी अकोला तालुक्यातील तलाठ्यांची बैठक घेतली. महसूल वसुलीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासह सात-बारा संगणकीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना तहसीलदारांनी यावेळी तलाठ्यांना दिल्या.
...........................................
दंडात्मक कारवाईची घेतली माहिती!
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाइ करण्यात येत आहे. अकोला उपविभागात करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.