अकोला: राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ७,८ व ९ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली आहे. या संपातअकोला जिल्ह्यातील राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, उर्दू शिक्षक संघटना सहभाग झाल्या आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली. कर्मचाऱ्यांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता.
कर्मचारी संपावर; कामकाज ठप्प, कार्यालयांमध्ये शुकशुकाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:09 PM
अकोला: राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ७,८ व ९ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली आहे.
ठळक मुद्देसंपाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली. संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला.