अकोला: अधिकारी दौर्यावर असल्याची संधी साधत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नगररचना विभागात कर्मचार्यांनी दांडी मारली. कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १0 वाजताची असली तरी, ११.३0 वाजेपर्यंत कार्यालयात १५ पैकी केवळ तीनच कर्मचार्यांनी हजेरी लावली. कर्मचार्यांच्या गैरहजेरीने ह्यनगररचनाह्ण वार्यावर असल्याचे वास्तव शुक्रवारी ह्यलोकमतह्णच्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमध्ये समोर आले. शहरी आणि ग्रामीण भागातील अकृषक जमिनीची परवानगी, गुंठेवारी, जागा मागणी, जमिनीचे मूल्यांकन, जमिनीची विभागणी व इतर परवानगी आणि कामांसाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयास तांत्रिक सल्ला देण्याचे महत्त्वपूर्ण काम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयामार्फत केले जाते. या कार्यालयात सध्या सहाय्यक संचालकांसह अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी आणि कर्मचार्यांची कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी १0 ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत आहे. त्यानुसार कर्मचार्यांनी कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १0 वाजताची असली तरी, शुक्रवारी नगररचना विभागाच्या सहायक संचालक न्यायालयीन कामानिमित्त नागपूर दौर्यावर गेल्या होत्या. विभागप्रमुख दौर्यावर असल्याची संधी हेरून, या कार्यालयातील कर्मचार्यांनी दांडी मारली. कर्मचार्यांची कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १0 वाजताची असली तरी, सकाळी ११.३0 वाजेपर्यंत या कार्यालयात केवळ एक सहाय्यक नगररचनाकार, एक वरिष्ठ लिपिक आणि एक शिपाई असे तीनच कर्मचारी हजर होते तर उर्वरित ९ कर्मचार्यांच्या गैरहजेरीत कार्यालतील खुच्र्या-टेबल रिकामे असल्याचे ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले. त्यामुळे अधिकारी दौर्यावर असल्याची संधी साधून, या कार्यालयातील कर्मचार्यांच्या गैरहजेरीत नगररचना विभागाचा कारभार वार्यावर सुरू असल्याचे चित्र पाहणीत दिसून आले. नगररचना विभागाच्या सहायक संचालक विजया जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयीन वेळेत कर्मचार्यांनी कार्यालयात आले पाहिजे, असे सांगुन वेळेवर कार्यालयात न येता गैरहजर राहिलेल्या कर्मचार्यांबाबत चौकशी करून, योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
असे आहे वास्तव!
सकाळी ११ ते ११.४५ या वेळेत नगररचना विभागाच्या कार्यालयात लोकमत चमूने फेरफटका मारला असता खालीलप्रमाणे वास्तव आढळून आले. ११ वाजता कार्यालयात १ सहाय्यक नगररचनाकार, १ वरिष्ठ लिपिक, १ शिपाई असे तीन कर्मचारी बसलेले दिसत होते. कर्मचारी गैरहजर असल्याने कार्यालयातील खुच्र्या व टेबल कर्मचार्यांविना रिकामे दिसत होते. कर्मचारी कार्यालयात नसल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प असल्याचे आढळून आले. सकाळी ११.३५ वाजता दोन कर्मचारी धावत-धावत कार्यालयात आले.