ते माफसू अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोलातर्फे दि. ५-९ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित 'श्वानपालन व आरोग्य व्यवस्थापन' या पाच दिवसीय ऑनलाइन राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील श्वान मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद देशपांडे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रम समारोपप्रसंगी डॉ. ए. पी. सोमकुवर, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता व डॉ. विलास आहेर, संचालक, विस्तार शिक्षण माफसू नागपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी प्रमुख पाहुणे तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक व गुजरात आदी राज्यांमधून १५५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात श्वानतज्ज्ञ डॉ. अपर्णा सतीश ( दिल्ली), डॉ. अनुपकुमार राठी, डॉ. मनोज पाटील, डॉ. प्रज्ञेय ताकसांडे (नागपूर), डॉ. मुकुलेश गटणे, डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. राजेश रोही (मुंबई) डॉ. सत्यवान आगिवले (उदगीर), डॉ. आनंद देशपांडे, डॉ. कस्तुरी भडसावळे, डॉ. मिलिंद म्हात्रे, डॉ. सागर भोंगळे, डॉ. सचिन काळे, डॉ. सीमा गुमळे (पुणे) व डॉ. अजित माळी (सातारा) यांनी ‘श्वानपालनातून व्यवसायाच्या संधी व आव्हाने’, ‘श्वानांची मानसिकता आणि वर्तणूक’, ‘श्वानांच्या जाती व प्रदर्शनासाठी तयारी,’ ‘श्वानांचे प्रजनन, आहार व्यवस्थापन; कान, नाक, दंत व्यवस्थापन; विविध रोग प्रतिबंध’ इत्यादी नावीन्यपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
आभार सहसमन्वयक डॉ. महेशकुमार इंगवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहसमन्वयक प्रा. डॉ. सुनील वाघमारे व डॉ. किशोर पजई यांनी परिश्रम घेतले.