शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

रोजगार बंद पडला; गरिबाच्या झोपडीत नव्हतं सांजीचं दळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 3:01 PM

स्वाभिमानी पती-पत्नीवर तान्ह्या मुलाला घेऊन भरउन्हात कूलरचे गवत विकण्याची वेळ आली आहे.

- नितीन गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पती-पत्नी आणि दोन वर्षांचा चिमुकला मुलगा, असा संसार.  पती बॅन्ड पथकात वाद्य वाजवून पैसे कमवायचा. घराचा उदरनिर्वाह चालायचा; परंतु कोरोनामुळे लग्नसराई बंद झाली. बॅन्ड पथक बंद पडले. रोजगार बंद पडला. त्यामुळे खायचे काय, असा या कुटुंबासमोर प्रश्न उभा राहिला. बॅन्ड पथकाचे काम बंद असल्यामुळे या स्वाभिमानी पती-पत्नीवर तान्ह्या मुलाला घेऊन भरउन्हात कूलरचे गवत विकण्याची वेळ आली आहे. साडीचा पाळणा करून त्यात तान्ह्या मुलाला निजवत ही माउली संकटात संसाराचा गाडा रेटण्याचा प्रयत्न करत आहे.

एक कवी आईचं दु:ख मांडताना म्हणतो, रडू नका रे मुलांनो गेले रे जोंधळ्याले...मायेच्या कुशीमंधी पोरं उपाशी निजले...काळजाच्या या घराची, झाली उपाशी घळण...गरिबाच्या झोपडीत नव्हतं सांजीचं दळण...

अशीच परिस्थिती मोलमजुरी करणाºया या गरीब कुटुंबांची झाली आहे. डॉ. आंबेडकर नगरात राहणारे श्यामराव तायडे हे एका बॅन्ड पथकात काम करतात. घरी पत्नी पूजा आणि दोन वर्षांचा मुलगा राज. राजा-राणीचा त्यांचा संसार. बॅन्ड पथकात वाद्य वाजवून श्यामराव महिन्याकाठी ८ ते १0 हजार रुपये कमवायचे; परंतु अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. संचारबंदी लागू झाली. नियोजित लग्नसमारंभही रद्द झाले. लग्नसराईच नाही, तर वाद्य वाजवायचे कुठे, असा प्रश्न उभा राहिला. रोजगारच उरला नाही, तर आता खायचे काय, अशा अनेक प्रश्नांचे काहूर श्यामराव तायडे यांच्या मनात सुरू झाले. गाठीचा असलेला पैसा संपला. आता पुढे काय, यातून मार्ग कसा काढायचा, पत्नी पूजा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. तिने धीर दिला. संसार चालविण्यासाठी... उदरनिर्वाह भागविण्यासाठी दोघा पती-पत्नीने तान्ह्या मुलाला घेऊन सिव्हिल लाइन चौकात कूलरचे गवत विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

दिवसभर उन्हातान्हात राबून १00-१५0 रुपये मिळतात. त्यातही पोलीसवाले हाकलून देतात. गवत जप्त करतात. तरीही हे दाम्पत्य पोटापाण्यासाठी दिवसभर राबून फाटलेल्या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हेही दिवस निघून जातील. या विश्वासावर हे तिघे स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्नबॅन्ड पथकाचे काम बंद असल्यामुळे कूलरचे गवत विकून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न पूजा व श्याम तायडे करीत आहेत. दिवसभर काम केले नाही, तर खावं काय, त्यात पोलीस कर्मचारी तेथे येऊन त्यांना हुसकावून लावतात. गवत फेकून देतात. करावे काय, सुचत नाही. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, स्वाभिमानाने जगण्यास मदत करावी, अशी अपेक्षा या दाम्पत्याने व्यक्त केली. 

बॅन्ड पथकाचे काम बंद झाल्याने, पतीवर बेकारीची वेळ आली. संसार चालविण्यासाठी पैसा लागतोच. त्यासाठी मी चिमुकल्या मुलाला घेऊन पतीसोबत कूलरचे गवत विकून संसार सावरण्याचा प्रयत्न करत आहे. -पूजा श्याम तायडे, गृहिणी.

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार