अकोला : राज्यात सरकारप्रती लोकांचा रोष दिसत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तनासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्तासंपादन महारॅली काढण्यात आली आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी मंगळवारी येथे केले.भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या नागपूर ते कोल्हापूर सत्तासंपादन महारॅलीचे अकोल्यात आगमन झाल्यानंतर अशोक वाटिका येथे आयोजित स्वागत सभेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते नवनाथ पडळकर व विजय मोरे उपस्थित होते. राज्यातील वेगवेगळ्या समूहातील वंचितांना न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे, असेही अण्णाराव पाटील यांनी सांगितले. सत्तासंपादन महारॅलीचे अकोला शहरात आगमन झाल्यानंतर अशोक वाटिका येथे स्वागत सभा घेण्यात आली. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, हिरासिंग राठोड, पी. जे. वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, सैफुल्ला खान, प्रभा शिरसाट, शोभा शेळके, डॉ. एम. आर. इंगळे, दिनकर वाघ, संध्या वाघोडे, वंदना वासनिक, भाऊसाहेब थोरात, शंकरराव इंगळे, श्रावण ठोसर, अशोक शिरसाट, डॉ. रहेमान खान, सुभाष रौंदळे, दामोदर जगताप, काशीराम साबळे, गजानन गवई, राजुमिया देशमुख, केशवराव बिलबिले, कश्यम जगताप, प्रा. संतोष हुशे, अॅड. संतोष रहाटे, बालमुकुंद भिरड, सम्राट सुरवाडे, डॉ. प्रसन्नजित गवई, पुष्पा इंगळे, अनघा ठाकरे, विद्या अंभोरे, पराग गवई, सचिन शिराळे, विकास सदांशिव, सुषमा कावरे, योगिता वानखडे, कविता राठोड, मंगला शिरसाट, प्रा. मंतोष मोहोड, कोकिळा वाहुरवाघ, संगीता खंडारे, पुरुषोत्तम अहिर, गजानन दांडगे, सागर कढोणे, प्रा. शैलेश सोनोने, सम्राट डोंगरदिवे, अमोल शिरसाट यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, भारिप-बमसं व वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.