अकोला : महाराष्ट्र आर्थोपोडिक असोसिएशनच्यावतीने आयोजित तीन दिवसीय ह्यमोआकॉनह्ण या राज्यस्तरीय परिषदेची रविवारी सायंकाळी उत्साहात सांगता झाली. अकोला आर्थोपोडिक सोसायटीद्वारा आयोजित तीन दिवसीय महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशन परिषदेत राज्यभरातील ६७५ डॉक्टर सहभागी झाले होते. रविवारी सकाळी ९ वाजतापासून आयोजित चर्चासत्रांच्या माध्यमातून डॉ. विजय शिंगाडे, डॉ. संदीप पटवर्धन, डॉ. अशोक जोहरी, डॉ. हरीश शहा, डॉ. रूता कुळकर्णी, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. शिवशंकर, डॉ.आर.एम. चांडक, डॉ. संजय सोनवणे, डॉ. अतुल पाटील, डॉ. हेमंत पाटणकर, डॉ.आर.एस. कुळकर्णी, डॉ. अतुल पाटील, डॉ.सी.जे. ठक्कर, डॉ. धिनदयालन, डॉ. अजित फडके, डॉ. शिवशंकर, डॉ.सी.एन. कुळकर्णी, डॉ. गाडेगोन, डॉ.डी.डी. तन्ना, डॉ. सचिन तपस्वी, डॉ.व्ही. रवींद्रन, डॉ. अनंत जोशी, डॉ. पराग संचेती, डॉ. आशिष बाभूळकर, डॉ. सुधीर राव आदींसह राज्यभरातून आलेल्या ६२ तज्ज्ञ डॉक्टरांनी कृत्रिम सांधे रोपण व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, तसेच अस्थिरोगांवर उपलब्ध विविध आधुनिक उपचार पद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेचा समारोप झाल्याची औपचारिक घोषणा सायंकाळी ५ वाजता पार पडलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आली. या ठिकाणी आयोजित प्रदर्शनात देशभरात आरोग्य क्षेत्राशी निगडित विविध साहित्य निर्मिती करणार्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनालादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘मोआकॉन’ परिषदेची उत्साहात सांगता
By admin | Published: November 10, 2014 1:06 AM