शहरातील मुख्य बाजारपेठ,शासकीय आवारभिंती, माेठे नाले तसेच प्रमुख चाैकांमध्ये अतिक्रमकांनी बजबजपुरी निर्माण केल्याची परिस्थिती आहे. यामुळे वाहतुकीच्या काेंडीसह अनेक समस्या निर्माण झाल्या असून अतिक्रमकांच्या मुजाेरीसमाेर प्रशासनाने गुडघे टेकल्याचे चित्र आहे. मतांच्या समीकरणापायी मनपातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक अतिक्रमकांची पाठराखण करतात. त्यामुळे मनपा आयुक्त निमा अराेरा ही समस्या निकाली काढतील की नाही,याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. यादरम्यान, गांधी राेड, खुले नाट्यगृह ते शास्त्री स्टेडियम ते दीपक चाैक, मानेक टाॅकीज ते टिळक राेड, सिटी काेतवाली ते गांधी चाैक, जैन मंदिर परिसर व गांधी चाैकातील चाैपाटीवरील अतिक्रमकांना आयुक्त अराेरा यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने पिटाळून लावले.
...अन् आयुक्त उतरल्या रस्त्यावर
सकाळी ११.४७ ला अतिक्रमण हटाव माेहिमेला सुरुवात झाली. यावेळी आयुक्त निमा अराेरा चक्क अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वाहनात बसून कारवाईसाठी निघताच कर्मचारी व सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली. खुले नाट्यगृहाजवळ येताच एका महिला व्यावसायिकासह काही प्लास्टिक विक्रेत्यांनी कारवाईला प्रखर विराेध दर्शवताच आयुक्त अराेरा वाहनाच्या खाली उतरल्या. आयुक्तांच्या निर्देशानंतर मुजाेरी करणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरू हाेती.
रस्त्यावर साहित्य ठेवणे भाेवले
मनपाकडून कारवाई हाेत असल्याचे दिसत असतानाही टिळक राेडवर सायकल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनी रस्त्यालगत सायकली उभ्या केल्या हाेत्या. नव्या काेऱ्या सायकली जप्त करण्यासाेबतच लघु व्यावसायिकांचे प्लास्टिकचे साहित्य, हातगाड्या आदी जप्तीची कारवाई करण्यात आली.
अतिक्रमणाच्या समस्येने शहरात पायी चालणेही मुश्कील झाले आहे. वाहतुकीला अडथळा हाेईल,अशा पध्दतीने व्यवसाय करणे अपेक्षित नाही आणि यापुढे खपवूनही घेतला जाणार नाही.
-निमा अराेरा आयुक्त,मनपा
...फाेटाे टाेले...