आगर : पाच हजार लोकवस्ती असलेल्या आगर येथे मुख्य चौकात मोठी बाजारपेठ असून, या बाजारपेठेत व्यापारीवर्ग तसेच नागरिकांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या अनेक वर्षापासून स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. परंतु तेथेही ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे.
यासंदर्भात गावातील अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, सदर अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी सरपंच, सचिव यांच्याकडे केली आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन वासनकर यांनी या संदर्भात वेळोवेळी लेखी अर्ज दिला आहे. परंतु या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे गावात विविध सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.