लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट शहरातील बँकांचे एटीएम बंद असल्याने त्या शोभेच्या वस्तू झाल्या आहेत. जनतेला पैसा काढण्याकरिता त्रास होत आहे. त्यामुळे भाजप सरकारचा निषेध करण्याकरिता अकोट शिवसेनेतर्फे एटीएमची अंत्ययात्रा १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी चौक येथून काढण्यात आली.ही अंत्ययात्रा स्थानिक आयसीआयसीआय बँकजवळ पोलिसांनी अडविली. या अंत्ययात्रेत माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, ज्ञानदेव परनाटे, साहेबराव भगत, निवृत्ती मेतकर, शरद नहाटे, दत्ताभाऊ चौधरी, ज्ञानेश्वर बोरोकार, चंदू दुबे, रोशन पर्वतकार, जितेश चंडालिया, गणेश डावर, अमोल पालेकर, विक्रम जायले, संजय गयधर, संदीप ठोसरे, डॉ. प्रशांत अढाऊ, अतुल नवात्रे, मुकेश निचळ, डॉ. प्रमोद गावंडे, विलास ठाकरे, दिनेश बोचे, बबलू कडू, योगेश बरेठिया, राहुल कवटकार, विश्वास गावंडे, देवानंद मोरे, श्रीकांत गाडेकर, गोपाल कावरे, श्रीकृष्ण गेंद, अंकुर गावंडे, बंडूभाऊ गावंडे, सोपान साबळे, पिंटू वानखडे, शुभम बोचे, सुरेश अंभोरे, विकास जयस्वाल, सचिन वानखडे, बाबाराव ताडे, अंकुश बोचे, दीपक देवर, संतोष बुंदेले, सुहास पवार, देवा दुबे आदीसह शेतकरी पॅनलचे पदाधिकारी उपस्थित होते.
एटीएमची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 2:45 AM