या प्रशिक्षण वर्गामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला अंतर्गत आयक्यूएसी व ईपीसी विभागातर्फे बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाच्या एकूण ७५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यासाठी प्राचार्य डॉ. वसुधा देव यांच्यासह डॉ. आशा धारस्कर, डॉ. अर्चना वातकर व डॉ. संध्या सामुद्रे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
पाच दिवसांच्या या वर्गामध्ये दोन सत्रामध्ये नियोजन करण्यात आले होते. यात पहिले बौद्धिक सत्र व दुसरे सैद्धांतिक सत्र आयोजित करण्यात आले. बौद्धिक सत्रामध्ये विद्या भारतीचे उद्दिष्ट व बौद्धिक क्षमतेला विस्तारणारी उपयुक्त माहिती सांगितली. तसेच सैद्धांतिक सत्रामध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षाप्रणाली व उत्तर शोधणारा विद्यार्थी घडविण्यासाठी शारीरिक शिक्षण, योगशिक्षण, नैतिक शिक्षण, संगीत व संस्कृत या विषयांचे कृतियुक्त शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
रोशन आगरकर यांनी विद्या भारती संस्थेबाबत थोडक्यात माहिती देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. शैलेश जोशी व पद्माकर धनोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. विजया मुंजे यांनी विद्या भारती वंदना म्हटली. महेश सावंत, शैलेश जोशी, रोशन आगरकर, मंगेश पाठक यांनी विचार व्यक्त केले. डॉ. शुभ्रा रॉय, डॉ. सोनाली हिंगे, डॉ. कल्पना देशमुख, संदीप पंचभाई यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ज्योती मेडीपिलवार, वैदेही तारे, जयपाल घोटी यांनी सूत्रसंचालन केले. आचार्य प्रशिक्षण वर्गाचा समारोपीय २० जूनला झाला. यावेळी श्रीकांत जोशी, डॉ. आशा धारस्कर, सुजित बघेल, पायल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश धारकर होते. प्रमुख वक्ते म्हणून शेषाद्री उपाख्य अण्णाजी डांगे यांच्यासह डॉ. मधुश्री सावजी, श्रीकांत देशपांडे, शैलेश जोशी, वैशाली नायगावकर, विजया मुंजे, डॉ. वसुधा देव, डॉ. आशा धारस्कर, डॉ. अर्चना वातकर, डॉ. संध्या सामुद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. आभारप्रदर्शन समीर थोडगे यांनी केले.