कोविड केअरमध्ये ५७४ खाटा रिक्त
जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये ५७४ खाटा रिक्त आहेत, तर याउलट स्थिती कोविड रुग्णालयांची आहे. तेथे रुग्ण प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरही बाहेर पडण्यास तयार होत नाही, तर दुसरीकडे गंभीर रुग्ण सातत्याने दाखल होत आहेत. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. यात समतोल आणणे गरजेचे आहे.
रुग्णांना साैम्य लक्षणे, तरीही रुग्णालयात
शासकीय कोविड रुग्णालयासह खासगी कोविड रुग्णालयातही साैम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाच जागा दिली जात आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील ६५.२५ टक्के खाटा रिक्त आहेत, तर डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटरमधील ५५.६२ टक्के खाटा रिक्त आहेत. साैम्य लक्षणे असलेल्यांना रुग्णालयातून येथे हलविण्याची गरज आहे.
ऑक्सिजन लेव्हल पाहून खासगीत केले जाते दाखल
शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कोरोना संसर्गामुळे झपाट्याने कमी होते. खासगी डाॅक्टर ९० च्या वर ऑक्सिजन असला तरच रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेतात. तेही त्याची आर्थिक परिस्थिती पाहून एन्ट्री मिळते.