अकोला - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रियेसाठी आणखी मुदत देण्यात आली आहे.रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या ऑनलाईन अर्जामध्ये दुरुस्त्याही करता येणार आहेत.राज्यातील काही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जागा रिक्त असल्याने या जागांवर प्रवेश देण्यात यावा, यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, महिलांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. २ ते १५ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना विविध ट्रेडसाठी प्रवेश देण्यात येणार असून, यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे. ज्या विद्या र्थ्यांनी इतर प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला नाही, तसेच त्यांचा इतर कुठेही शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून, त्यांना नव्याने पर्याय सुचविण्याचीही मुभा देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्जामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘आयटीआय’च्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया
By admin | Updated: September 8, 2014 00:06 IST