अकोला : प्रलंबित आणि न्यायिक मागण्यांसाठी ‘ईपीएफओ’च्या कर्मचाऱ्यांनी बुधवार दि.२८ आॅगस्ट रोजी देशव्यापी कामबंद आंदोलन छेडले. सरकारच्या धोरणाविरूध्द आक्रमक नारेबाजी करीत अकोल्यातील सिव्हील लाईन चौकातही हा निषेध नोंदविण्यात आलासरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयात अधिकारी आणि कर्मचाºयात दुजाभाव केला आहे. अधिकाºयांना भरभरून तर बी, सी, आणि डी श्रेणीतील कर्मचाºयांना सरकारने ढेंगा दाखविल्या गेल्याने कर्मचाºयांत रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नती, थांबविलेली नोकर भरती याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘ईपीएफओ’ कर्मचाºयांनी देशभरात आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. खासदार प्रेमचंद्रन, आर. कृपाकरण आणि अखिल भारतीय कर्मचारी भविष्य निर्वाह स्टाफ संघाच्या नेतृत्वात १ ते २७ आॅगस्टपर्यंत टप्पेवारी आंदोलन छेडल्या गेले. संपूर्ण भारतभरात दुपारच्या भोजन अवकाश कालावधीत काळ्या फीत लावून आणि निदर्शने करून निषेध नोंदविला जात आहे. कर्मचारी अर्धे अन् कामाचा भार अतिरिक्त असल्याने रोष अधिक वाढत जात आहे. दुसºया चरणातील आंदोलन १९ आॅगस्टपासून पाच दिवस केले जात आहे. त्यातील एक भाग म्हणून २३ आॅगस्ट रोजी सर्व कर्मचाºयांनी काळा पोशाख परिधान करून निदर्शने दिलीत.दरम्यान बुधवार दि.२८ आॅगस्ट रोजी अकोल्यातील ‘ईपीएफओ’च्या कर्मचाºयांनी देशव्यापी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला. अकोला युनियन विभागाचे सचिव दिनेश बाजीराव, उपाध्यक्ष राजेश बुधे, प्रसाद माटे, धनंजय फाटे, रघुबीर ठाकूर, हर्षला खोब्रागडे, मनीषा रामटेके यांच्या पुढाकार अकोल्यात निदर्शने दिली गेलीत.