अकोला- गीता परिवार, संगमनेरच्या अकोला शाखेच्या अध्यक्षपदी सेवाभावी कल्पना भुतडा यांची व सचिवपदी सेवाभावी जया जाजू यांची नियुक्ती करण्यात आली.
गीता परिवाराचे कार्य परिवाराचे कार्यकारी अध्यक्ष संगमनेर येथील संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण भारतात आपल्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अखंडपणे सुरू आहे. बालकांच्या शरीर, मन व बुद्धीच्या विकासासाठी ‘सम्यक आकार’ अर्थात संस्कारांचे रोपण करण्याचे कार्य अनेक शहर व गावागावांत सुरू आहे. या अनुषंगाने गीता परिवार, अकोला शाखेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीत अभिभावक म्हणून ज्योती बाहेती, उपाध्यक्ष कविता मालू, कोषाध्यक्ष वीणा राठी, केंद्र विस्तारप्रमुख वंदना चांडक, गीता प्रचारप्रमुख संगीता काकाणी, अभिभावक संपर्कप्रमुख महेश मुंदडा, विद्यालय संपर्कप्रमुख सुनील दांदळे, उत्सव आयोजन प्रमुख लीला मालपानी, समाजमाध्यम प्रमुख मीना टावरी, संस्कार सृजनप्रमुख सीमा राठी कामकाज पाहणार आहेत.
चौधरी विद्यालयात कोविड चाचणी शिबिर
अकोला... स्थानिक रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाऊनच्या वतीने चौधरी विद्यालय प्रांगणात ७ ते ९ मार्चपर्यंत तीनदिवसीय रॅपिड अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचा प्रारंभ उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या मार्गदर्शनात तथा बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, अजय काळे, विदर्भ चेंबरचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, राहुल गोयनका, सुधीर रांदड, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष प्रकाश सारडा, सचिव संदेश रांदड, आदित्य मोहता, आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. या शिबिरात तब्बल एक हजार आठशे महिला-पुरुष नागरिकांनी आपली चाचणी करून या उपक्रमात सहभाग घेतला. चाचणी जिल्हा स्त्री-रुग्णालयाचे डॉ. आशिष गिरे, लॅब तंत्रज्ञ अंकिता ताले, ऐश्वर्या कांबळे, शुभम लांजूळकर, शिल्पा मोकरकर, पूनम चव्हाण, आदींनी केली. मिडटाऊनचे अध्यक्ष प्रकाश सारडा यांनी या उपक्रमाची माहिती देत खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. हा प्रकल्प कपिल माहेश्वरी, गौरव अग्रवाल, हेमंत मोहता, गोपाल लोहिया यांनी साकार केला. उपक्रमाच्या सफलतेसाठी रोटरी मिडटाऊनचे दिवेश शहा, प्रशांत मानधने, निखिलेश मालपाणी,रोहित चांडक, युसूफ अकोलावाला, अबिद चिनी, भरत वखारिया, नीलेश मालपाणी, डॉ. गिरीश राठी, ब्रिजेश ठाकूर, चिराग मार्डीया, रवी जोशी, चेतन राजा, कपिल माहेश्वरी, कुणाल भूतडा, पीयूष देशमुख, रवींद्र टेकडीवाल, अमित वीरा, आनंद चांडक, मनीष लड्डा, आदींनी परिश्रम घेतले.