अकोला : भाविक अत्यंत आतूरतेने वाट पाहत असलेल्या नवदुर्गा उत्सवाला घटस्थापनेच्या दिवसा पासून प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात गुरुवारी ढोल ताशांच्या गजरात उत्साहात नवदुर्गेची स्थापना करण्यात आली. गत पंधरा दिवसांपासून नवदुर्गा उत्सवाची तयारी सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक नवदुर्गा मंडळांनी देवीची स्थापना करण्यासाठी मंडप सजवून ठेवले आहेत. यामध्ये गुरुवारी विधिवत पूजा करून नवदुर्गेची स्थापना करण्यात आली. विधानसभा निवडणुकीचे सावट असल्यावरही भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमी दिसली नाही. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांंनी गुलाल उधळी त, ढोल ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक काढत स्थापना केली. तसेच शहरातील विविध देवीच्या मंदिरात सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी दिसत होती. काही सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळांच्यावतीने दांडिया खेळण्याला सुरुवात करण्यात आली आहे. सायंकाळी मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या मैदानात तरुण- तरुणींनी दांडिया खेळला.
नवदुर्गेची हर्षोल्हासात स्थापना
By admin | Published: September 26, 2014 1:49 AM