लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी सदोष रीडिंग घेताना निदर्शनास येत असल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांकडून दररोज ५ टक्के मीटर रीडिंगची फेरतपासणी राज्यभर सुरू आहे. गत महिन्यापासून ही पद्धत अवलंबिल्या जात असली, तरी अकोल्यात अजूनही सदोष मीटर रीडिंग होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे अनेक वीज ग्राहकांना ‘अॅव्हरेज’ बिलाचा फटका सहन करावा लागत आहे.ग्राहकांना अचूक व योग्य वीज देयक देण्यासाठी महावितरणने मोबाइल अॅप्सद्वारे वीज मीटर रीडिंगची प्रणाली विकसित केल्यामुळे रीडिंगची पद्धत सोपी झाली आहे; मात्र रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी मात्र सदोष रीडिंग घेत असल्याच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांना जून महिन्याचे बिल ‘अॅव्हरेज’ आले. वीज मीटर व्यवस्थित असताना अॅव्हरेज बिल कसे येऊ शकते, असा सवाल अनेक ग्राहकांनी उपस्थित केला आहे. जून महिन्यात वीज वापर कमी असतानाही उन्हाळ्यातील तीन महिन्यांची सरासरी लक्षात घेऊन काढण्यात आलेले बिल जास्त असल्याच्या तक्रारी वीज ग्राहकांकडून येत आहेत. सदोष मीटर रीडिंग घेणाºया रीडिंग एजन्सीच्या दोन कर्मचाºयांवर गत आठवड्यात नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या निर्देशांवरून कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे चालू महिन्यात सदोष मीटर रीडिंगला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वीज ग्राहकांनीही जागृत होण्याची गरजसदोष मीटर रीडिंगमुळे वीज बिल अव्वाच्या सव्वा येणे, अॅव्हरेज बिल येणे, असे प्रकार वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर वीज ग्राहकांनीही जागृत होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांनी आपला ग्राहक क्रमांक महावितरणकडे नोंदणी केल्यास वीज बिलाची माहिती घरबसल्या एसएमएसद्वारे मिळते. तसेच मीटर रीडिंग घेतले गेले नाही, तर तसा एसएमएस येऊन मोबाइल अॅपद्वारे आपले रीडिंग आपणच पाठविण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होऊ शकते. याशिवाय सुविधा केंद्रांमध्ये जाऊन तक्रारही करता येते.
५ टक्के रीडिंगच्या फेरतपासणीनंतरही ‘अॅव्हरेज’ बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 2:28 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी सदोष रीडिंग घेताना निदर्शनास येत असल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांकडून दररोज ५ टक्के मीटर रीडिंगची फेरतपासणी राज्यभर सुरू आहे. गत महिन्यापासून ही पद्धत अवलंबिल्या जात असली, तरी अकोल्यात अजूनही सदोष मीटर रीडिंग होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे अनेक वीज ग्राहकांना ‘अॅव्हरेज’ बिलाचा फटका ...
ठळक मुद्देसदोष मीटर रीडिंगच्या तक्रारी सुरूच; वीज ग्राहक त्रस्त