बाजारपेठेतील गर्दी ठरतेय धोकादायक
अकोला: सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. गत आठवडाभरापासून अकोल्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे, मात्र यानंतरही अनेक जण बेफिकिर असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या या बेफिकरीमुळे कोरोनाचा फैलाव आणखी वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धुळीमुळे श्वसनसंस्थेशी निगडित आजारांत वाढ
अकोला: शहरातील मध्यभागात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या निर्मीतीचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळ पसरलेली आहे. वातावरणातील बदल आणि धुळीमुळे अनेकांना श्वसनसंस्थेशी निगडीत आजारांना सामोरे जावे लागत आहे. यापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले.
तिळक मार्गावर वाहतुकीची कोंडी
अकोला: शहरातील टिळक मार्गावर रविवारी बाजार भरतो. त्यामुळे या ठिकाणी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. रस्त्यावरील बाजारामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे दिसून आले. या मार्गावर अतिक्रमण असल्यामुळे दररोज या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
नॉनकोविड ओपीडीत रुग्णसंख्येत वाढ
अकोला: वातावरणातील बदलांमुळे सर्दी,खोकल्यासह इतर आजारांनीही डोकेवर काढले आहे. त्यामुळे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नॉनकोविड ओपीडीत रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.